दुसाळेचे वीर जवान सचिन जाधव यांना चीन सीमेवर वीरमरण | Latest Marathi News


शनिवारी मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सातारा : पाटण तालुक्यातील दुसाळे (पो. वजरोशी) गावचा सुपुत्र, वीर जवान सचिन संभाजी जाधव (वय ३८) यांना बुधवारी (दि. १६) भारत - चीन सीमेवर लडाखमध्ये कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. त्यांच्या वीरमरणाची बातमी गावात पसरताच दुसाळे गावावर दु:खाचा डोंगर कोसळला असून दुसाळेसह परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुसाळे या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शहीद जाधव यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आईवडील तसेच भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या घराला लष्करी सेवेचा मोठा वारसा आहे. ते स्वत: १११ इंजिनिअर रेजिमेंटमध्ये नायक या पदावर कार्यरत होते. त्यांचे वडील संभाजी जाधव हेही लष्करी सेवेत होते. ते सुभेदार मेजर पदावरून निवृत्त झाले आहेत. तसेच त्यांचे भाऊदेखील देशसेवा बजावत आहेत. शुक्रवारी रात्री १०.१० वाजता शहीद जाधव यांचे पार्थिव विशेष विमानाने पुणे येथे पोहचणार असून शतिवारी (दि. १९) रोजी त्यांच्या पार्थिवावर मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कमांडर विजयकुमार पाटील (निवृत्त) यांनी दिली.


Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या