‘यमाईमाता’ व लायन्सतर्फे मसूरमध्ये गरजुंना वाफारा मशिन्स | Latest Marathi News


मसूर :
गणेशोत्सवात होणाऱ्या खर्चाला बगल देत मसूर येथील यमाईमाता गणेश मंडळ व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना या संसर्गजन्य रोगावर मात करता यावी म्हणून समाजातील गरजूंना ४० वाफारा मशिन्सचे वाटप करण्यात आले. यावेळी झी टीव्हीवरील 'देवमाणूस' मालिकेत भूमिका केल्याबद्दल शिवराज फाटक यांचा व दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या हर्षदा बाजारे, श्रेयस काशिद, सानिका देसाई, ध्रुव साळुंखे या विद्यार्थ्यांचा जान्हवी पुरोहित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील, मसूर लायन्स क्लबच्या अध्यक्षा जान्हवी पुरोहित, यमाई माता मंडळाचे अध्यक्ष उमेश कदम, माजी उपसरपंच शांताराम मोरे, ग्रामपंचायत सदस्य दिग्विजयसिंह जगदाळे, लायनचे माजी प्रांतपाल जगदीश पुरोहित, मसूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार गणेश भोसले, अँड. रंणजीतसिंह जगदाळे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. कोरोनाच्या काळात वाफारा मशिनचे वाटप करून यमाईमाता गणेश मंडळ व लायन्स क्लबने समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. यापुढेही मंडळाच्या सामाजिक उपक्रमास लायन्स क्लब सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही जगदीश पुरोहित यांनी दिली. यावेळी दिलीप पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास लायनच्या खजिनदार सुजाता पाटील, जितेंद्र निकम, राम धरणे, राजेंद्र माळवदे, शंकर बाईंग, वैभव गुरव, संकेत काशिद, अनिकेत बाईंग, प्रदीप जैन, प्रशांत बाजारे, गणेश कदम, शिवराज बाजारे यांच्यासह यमाई माता मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रकाश बाजारे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सदाशिव रामुगडे यांनी केले, तर सुरेश पाटील यांनी आभार मानले.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या