जिल्ह्यावर आजही कोरोनाचा वज्राघात; तब्बल ८२८ रूग्णांची वाढ | Latest Marathi News


सातारा :
दररोजच्या रूग्णवाढीचा धसका घेतलेल्या सातारा जिल्ह्यावर आजही कोरोनाचा वज्राघात झाला. रात्री उशीरा हाती आलेल्या वृत्तानुसार जिल्ह्यात कोरोनाचे आणखी ८२८ रूग्ण वाढले आहेत. वाढत्या रूग्णसंख्येने जिल्ह्यातील आरोग्य सेवेची परिस्थिती चिघळत चालली आहे. आता सर्वांनीच या संकटामुळे हाय खाल्ली असून संकट आटोक्यात येणार तरी केव्हा असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे.

सुरूवातीला कोरोनाच्या रूग्णवाढीचे लहान आकडेही मोठे वाटत होते. पण दुर्दैवाने आता दररोज पुढे येत असलेल्या आकड्यांनी लोकांची पाचावर धारण बसली आहे. गेल्या आठवड्यांपासून दररोजच उच्चांकी आकडे समोर येत असल्याने लोक हादरले आहेत. या दररोजच्या रूग्णवाढीचा लोकांनी धसकाच घेतला आहे. आज रात्री उशीरा ८२८ रूग्ण वाढल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून जिल्हावासीयांवर जणू हा वज्राघातच आहे. यासह जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १६ हजार ७८८ पर्यंत गेली आहे. रूग्णांचा गावनिहाय व तालुकानिहाय तपशील शुक्रवारी (दि. ४) प्राप्त होणार आहे. त्या यादीत आपल्या गावातील, परिसरातील कोण आहे याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

वाढत्या रूग्णसंख्येचा आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत असून अनेक रूग्णांना बेड मिळत नाहीत, त्यातील काहींना बेडअभावी, ऑक्सिजनअभावी प्राण गमवावे लागत असल्याची अवस्था पहायला मिळत आहे.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या