जिल्ह्याची कोरोनामुक्तीत ‘दशसहस्त्रेषू’ कामगिरी; नवीन ८२७ पॉझिटिव्ह | Latest Marathi News


सातारा :
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावातही जिल्ह्यात कोरोनाचा रिकव्हरी रेट चांगला असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. मोठ्या प्रमाणावर नागरिक कोरोनावर मात करत असल्याने कठीण संकटातही लोकांना हायसे वाटत आहे. आजही दिवसभरात जिल्ह्यात विविध रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या ६९७ नागरिकांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्तीने दहा हजारचा टप्पा आज पार केला आहे. दरम्यान, रात्री उशीरा प्राप्त झालेल्या वृत्तानुसार जिल्ह्यात आणखी ८२७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आज स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील २१, कराड उपजिल्हा रुग्णालय ७४, फलटण उपजिल्हा रुग्णालय ७२, कोरेगाव ९२, वाई १०६, खंडाळा १५३, रायगाव ९०, पानमळेवाडी ७२, मायणी १०५, महाबळेश्वर ६०, तळमावले ९ व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे १४९ अशा एकूण १ हजार ३ जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

सातारा जिल्हा कोरोना

  1. घेतलेले एकूण नमुने - ४९,२६७
  2. एकूण बाधित - १७,६६३
  3. घरी सोडण्यात आलेले - १०,४७१
  4. मृत्यू - ४७३
  5. उपचारार्थ रुग्ण - ६,७१९

Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या