‘तुझ्या तोंडावर अ‍ॅसिड टाकतो, कोण लग्न करतंय तेच बघतो’ | Latest Marathi News


प्रेमवीराच्या धमकीने खळबळ; पोलिसांनी तात्काळ केले गजाआड

Marathi News... सातारा : प्रेमास नकार दिल्यामुळे महाविद्यालयीन युवतीला चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना सातारा शहरात घडली. याप्रकरणी एका युवकाला सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे. विक्रम बाळकृष्ण निपाने (रा. महादरे, ता. सातारा) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.

सातारा येथील एका महाविद्यालयात २७ वर्षीय युवती शिक्षण घेत आहे. विक्रम निपाणे हा गेल्या दहा वर्षांपासून त्या युवतीचा पाठलाग करत होता. तू मला खूप आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझ्या सोबत लग्न करायचे आहे, अशी तो युवतीला गळ घालत होता. मात्र संबंधित युवतीने त्याला स्पष्ट नकार दिला. 

यामुळे निपाणे याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने तू जर माझ्यासोबत लग्न केले नाहीस, तर बघ मी काय करतो. तुझ्या तोंडावर अ‍ॅसिड टाकतो, बघतो तुझ्याबरोबर कोण लग्न करतोय ते, अशी धमकी त्याने त्या युवतीला दिली. 

या प्रकारानंतर घाबरलेल्या युवतीने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन निपानेच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संशयित युवकाला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम अधिक तपास करत आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या