कराड : सातारा जिल्ह्यातील कोविडची स्थिती पाहता कराड अर्बन बँकेच्या सभासदांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी बँकेने दहा पोर्टेबल ऑक्सिजन मशिन्स खरेदी केल्या आहेत. त्याद्वारे सभासदांना गरज भासल्यास मदत करण्याचे उद्दिष्ट बँकेने ठेवले आहे, अशी माहिती अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांनी दिली.
सहा महिन्यांपासून जागतिक पातळीवर जवळपास सर्वच देशात कोरोनाचे संकट आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मोठी व्याप्ती वाढली आहे. कोरोनाचा खूप वेगाने प्रसार होत आहे. त्यामुळे त्याचा अतिरिक्त भार वैद्यकीय सेवेवर पडत आहे. रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत. मेडिकल उपकरणांची कमतरता जाणवत आहे. त्याच ऑक्सिजन बेडचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. उपचाराअभावी रुग्णांना गंभीर परिस्थितीचा सामना करण्याची वेळ येत आहे. त्याचा विचार करून बँकेने सभासदांना वेळेवर मदत करता यावी, या भावनेतून १० पोर्टेबल ऑक्सिजन मशिन खरेदी केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
कराड अर्बन बँकेला सामाजिक बांधिलकीचा प्रदीर्घ वारसा आहे. त्याची बँक परोपरीने जपणूक करत असते. बँकेने ७० वर्षांपूर्वी म्हणजेच १९५१ मध्ये रुग्णांसाठी साधनांची उपलब्धता करून दिली होती. त्यावेळी रुग्णसेवा संग्रह अशी अभिनव कल्पना राबवली होती. त्यामुळे बँकेस समाजव्रताचे अधिष्ठान सुरुवातीपासून आहे. तोच वारसा आजही बँकेने जपला आहे. कोरोना संकटामुळे उद्भवलेल्या स्थितीतही पहिल्या दिवसापासून कराड अर्बन बँक ग्राहकांना बँकिंग सेवा देत आहे.
ऑक्सिजन मशिनसाठी संपर्क
कराड अर्बन बँकेच्या गरजू सभासदांनी मशिनसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांच्याशी (मोबाईल ९८८१८१२८४८ विंâवा ९८२३२८७८१०) संपर्क साधण्याचे आवाहन बँकेने केले आहे. गरजू सभासदांना तातडीने या मशिन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या