रिपब्लिकन पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने | Latest Marathi News


कामगार व शेतकरीविरोधी विधेयकाविरोधात नोंदवला निषेध

Marathi News... सातारा : कामगार व शेतकरीविरोधी विधेयक केंद्र सरकारने नुकतेच संसदेत पारित केले. त्यावर राष्ट्रपतींनी सही केली आहे. याचा निषेध नोंदवत रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ व जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले.

यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर शेतकरी व कामगारांच्या संदर्भातील विधेयक संसदेत मंजूर केले. त्यावर तातडीने राष्ट्रपतींनी सहीदेखील केली आहे. या विधेयकामुळे शेतकरी व कामगारांवर अन्याय होणार आहे. कामगारांच्या हितापेक्षा भांडवलदारांचे हित जपण्यासाठीच केंद्राने हा निर्णय घेतला आहे. 

यापुढे कामगारांना कंत्राटी ठेवण्याचा अधिकार कंपन्यांच्या मालकांना मिळाला आहे. तसेच तीनशेच्यावरील कामगारांना मालक केव्हाही काढू शकणार आहे. शेतकरी व कामगारांचे या विधेयकामुळे मोठे नुकसान होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कामगार हिताच्या कायद्याची पायमल्लीच केंद्रातील सरकारने केली आहे. याचा आम्ही पक्षाच्या वतीने निषेध करत आहोत.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष किरण ओव्हाळ, सोमनाथ धोत्रे, अनिल उमाप, तालुकाध्यक्ष दीपक गाडे, जयवंत कांबळे, सचिन गंगावणे, राम लंकेश्वर, विशाल भोसले, प्रतिक गंगावणे तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या