जिल्ह्यातील उपलब्ध बेडची माहिती आता एका क्लिकवर | Latest Marathi News


पुढील आठवड्यापासून ऑक्सिजन, आयसीयू बेडची संख्या वाढणार
 

Marathi News... सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील रुग्णालयांमधील उपलब्ध बेडची माहिती १०७७ या दूरध्वनीवर नागरिकांना मिळत होती. लवकरच लिंक व वेबसाईटमार्फत उपलब्ध बेडची माहिती नागरिकांना मिळेल. यामध्ये ऑक्सिजन व आयसीयु बेडची माहितीदेखील उपलब्ध होईल, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.

यापूर्वी आपल्याकडे ३०० ते ३५० ऑक्सिजन बेड उपलब्ध होते. साधारणत: पुढच्या आठवड्यापासून १३०० बेड उपलब्ध होतील. तसेच आयसीयु बेडची संख्याही ७० ते ८० ने वाढेल, अशी दिलासादायक माहिती त्यांनी दिली.

सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी होम आयसोलेशन व्हावे. त्या संदर्भातील सूचना पूर्वीच प्रसिद्ध केल्या आहेत. अत्यंत आवश्यक असल्यासच बेड उपलब्ध होतील. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी हॉस्पिटल बेडची मागणी करु नये, अशी अपेक्षाही शेखर सिंह यांनी यावेळी व्यक्त केली. 

दोन दिवसांत रेमडेसिव्हर उपलब्ध होणार

जिल्ह्यातील रेमडेसिव्हर औषधाचा मोठा साठा क्वॉलिटी चेकिंगमध्ये रिजेक्ट झाल्याने मागील काही दिवसांमध्ये राज्यात औषधाची कमतरता भासत होती. पालकमंत्री बाळासाहेब पाटील व आपण स्वत: याबाबत जातीने लक्ष घालून येत्या एक - दोन दिवसांत रेमडेसिव्हर इंजेक्शन्स कशी लवकरात लवकर उपलब्ध होतील याकडे लक्ष देणार आहोत. तसेच भविष्यातही या औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध करुन घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.  

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेस सहकार्य करा

जिल्ह्यात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेचा पहिला टप्पा सध्या सुरु आहे. हा टप्पा १० ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. या मोहिमेअंतर्गत आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक, शासकीय कर्मचारी हे घरोघरी जावून तपासणी करणार आहेत. जेणेकरून लवकरात लवकर लक्षणे असलेल्या बाधित रुग्णास वेळीच उपचार सुरु करुन मृत्यूदर कमी करता येईल. नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या सेवकांना सहकार्य करावे. त्यानंतरही कोणाला कोरोना विषयक लक्षणे आढळल्यास किंवा तशी शंका आल्यास त्यांनी त्वरित आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना भेटण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या