माजी सैनिकांचे रक्त सळसळले; म्हणाले, आम्ही सज्ज आहोत... | Latest Marathi News


सातारा :
विस्तारवादी चिनी ड्रॅगनच्या वाढत्या कुरापतींमुळे तेजस्वी लष्करी परंपरा असलेल्या सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक अस्वस्थ झाले आहेत. युद्धजन्य परिस्थिती आलीच तर आम्ही त्यासाठी सज्ज आहोत, अशा आशयाचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

सातारा हा शूरवीर, सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हिंदुस्तानी सैन्यात जिल्ह्यातील असंख्य तरुण देशसेवा बजावत आहेत. देशावर कोणतेही संकट आले तर सातारकर शांतपणे बसून बघूच शकत नाहीत, याचाच प्रत्यय पुन्हा यानिमित्ताने आला आहे. अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ चीनी सैन्यांनी मोठी जमवाजमव सुरू केली आहे. त्यामुळे हिंदुस्तान लष्कराला 'हाय अलर्ट'वर ठेवण्यात आले आहे. हिंदुस्तान सीमेवरील या युद्धजन्य परिस्थितीमुळे माजी सैनिकांमध्ये अस्वस्थता आहे. 

सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर काहीजण शासकीय कार्यालयात नोकरी करतात, तर काही पोलीस भरती होतात. अशा कर्मचाऱ्यांची 'शासकीय पुननियुक्त माजी सैनिक संघटना' कार्यरत आहे. या संघटनेच्या सातारा शाखेचे २०० कर्मचारी सभासद आहेत. सैन्यातून निवृत्त झाल्यावर भलेही त्यांनी अंगावरील वर्दी उतरवलेली असेल आणि शस्त्र खाली ठेवले असेल, पण त्यांच्या रक्तातील लढावू बाणा थोडाही कमी झालेला नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. 

या निवेदनात संकट काळात राज्य शासनाने आदेश दिल्यास पुनर्नियुक्त माजी सैनिक प्रत्यक्ष सीमारेषेवर जाऊन कोणत्याही प्रकारच्या सेवा देण्यास व जबाबदारी उचलण्यास सक्षम आहेत, असे नमूद केले आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ इंदलकर, उपाध्यक्ष रमेश माने, संजय बोराटे, अशोक महाडिक उपस्थित होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या