उंब्रजजवळ पेट्रोल पंपावर दरोडा; पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे | Latest Marathi News


उंब्रज :
पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी मध्यरात्री पेट्रोल पंपावर पडलेल्या धाडसी दरोड्यातील आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यांच्यासंदर्भात महत्वाचे धागेदोरे हाती लागले असून ठसेतज्ञांना बोलावून संशयितांच्या बोटांचे ठसेही मिळवण्यात आले आहेत. तपासासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत. लवकरच आम्ही संशयितांचा माग काढू, असा विश्वास उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी व्यक्त केला.

सोमवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास महामार्गालगत शिवडे गावच्या हद्दीतील एसके पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचा बहाणा करून संशयित आले होते. दोन मोटरसायकलवरून आलेल्या या सहा जणांच्या टोळीने गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करून ऑफिसमधील २५ हजाराची रोकड व दोन मोबाईल घेऊन पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी पेट्रोल पंपावर धाव घेऊन माहिती घेतली व तपासाची चक्रे गतीमान केली. जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले.

दरम्यान, संशयित आरोपी २० ते २५ वयोगटातील असून त्यांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तपासासाठी त्याचा उपयोग होणार आहे. आरोपींविषयी महत्वाचे धागेदोरे हाती लागले असून तपासासाठी तीन पथके कामाला लावण्यात आली आहेत. घटनास्थळावरून फिंगर प्रिंट्स मिळवण्यात आल्या आहेत. लवकरच आम्ही या प्रकरणाचा छडा लावू, असा विश्वास गोरड यांनी व्यक्त केला.


Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या