पाटण : पाटण तालुक्यात गुरूवारी नव्याने २५ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली, तर २८ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे तालुक्यात ५५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत तालुक्यात एकूण १ हजार १४१ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी तब्बल ७२९ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ३५७ बाधितांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पाटील यांनी दिली.
बुधवारी रात्री आलेल्या अहवालात मल्हारपेठ येथील ५७ वर्षीय पुरूष, २६ वर्षीय महिला, सुळेवाडी येथील १४ वर्षीय बालक, गिरेवाडी येथील ८२ वर्षीय पुरूष, विहे येथील ५० वर्षीय महिला, सणगरवाडी येथील ३० वर्षीय पुरूष, पाटण येथील ७४, २३, १६, ५८ , ६९ वर्षीय पुरूष, ४६ वर्षीय महिला, मारूल हवेली येथील २८ पुरूष, मुळगाव येथील ६५ वर्षीय पुरूष, ढेबेवाडी येथील २३ वर्षीय महिला, भोसगाव येथील २६ वर्षीय महिला, मानेगाव येथील ३५ वर्षीय पुरूष, निसरे येथील ६०, ६५ वर्षीय पुरूष, बहुले येथील ४२, ६६ वर्षीय पुरूष, १६, ५५ वर्षीय महिला, सणबूर येथील ७२ वर्षीय पुरूष, मराठवाडी येथील ५५ वर्षीय महिला या पंचवीस व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या बाधितांवर तातडीने पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत.
सध्या एकूण ३५७ बाधितांवर कराडच्या कृष्णा, सह्याद्री हॉस्पिटल, सातारच्या सिव्हिल हॉस्पिटल व पाटण येथील कोरोना केअर सेंटर याशिवाय काहींवर होम क्वॉरन्टाईन करून तेथे पुढील उपचार सुरू आहेत. गुरूवारी नव्याने २८ व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडून आगामी सात दिवसांसाठी होम क्वॉरन्टाईन करण्यात आले आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कातील कुटुंबीय व नातेवाईक आदी हाय रिस्कमधील व्यक्तींना पाटण येथील प्रियदर्शनी महिला वसतीगृह, मिल्ट्री बॉईज होस्टेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जुने वसतिगृह व तळमावले येथील कोरोना केअर सेंटर व काहींना होम क्वॉरंटाईन करून तेथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
पाटण तालुका अपडेट
- एकूण बाधित - ११४१
- कोरोनामुक्त - ७२९
- उपचाराखाली - ३५७
- एकूण मृत्यू - ५५
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या