घरी जावून केला सत्कार, कुटुंबीयांची ऑक्सिजन तपासणी
मसूर : मसूर लायन्स क्लबच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त क्लबच्या अध्यक्षा जान्हवी पुरोहित व माजी प्रांतपाल जगदीश पुरोहित यांनी शिक्षकांचा घरी जावून सत्कार केला. तसेच ऑक्सिमीटरच्या सहाय्याने शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांची तपासणी केली.
समाजाची जडणघडण करण्यामध्ये शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे. राष्ट्राची वाटचाल आदर्शाकडे आणि सर्वांगीण उत्कर्षाकडे होण्यासाठी शिक्षकांनी विध्यार्थ्यांवर केलेले संस्कार समाज कधीही विसरणार नाही, असे प्रतिपादन जान्हवी पुरोहित यांनी यावेळी केले. देशाची भावी पिढी घडविण्यासाठी अविरतपणे परिश्रम घेत असलेल्या गुरुजनांचा सत्कार करण्याचे भाग्य आमच्या क्लबला लाभले हे आमचे भाग्य समजतो, असेही त्या म्हणाल्या.
याप्रसंगी क्लबतर्फे सेवानिवृत्त शिक्षक डी. ए. भोज, प्रा. मनिषा भोज, प्रा. सुजाता पाटील, श्री समर्थ हायस्कूलचे मुख्याध्यापक जगन्नाथ कुंभार यांच्यासह अनेक शिक्षकांचा शाल व बुके देवून सत्कार करण्यात आला. यावेळी माजी प्रांतपाल जगदीश पुरोहित यांनी ऑक्सिमिटरच्या सहाय्याने शिक्षकांची व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची तपासणी करुन कोव्हिड संक्रमणापासून काळजी घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास मसूर प्राथमिक शाळा (मुली) व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदिप पाटील, लायन्सचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील, सागर पुरोहित यांची उपस्थिती होती.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या