दुर्मिळ कासव विकण्यासाठी ‘सावज’ शोधणारेच झाले पोलिसांचे सावज | Latest Marathi News


सातारा :
येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी वन्यजिवांच्या संरक्षणाच्या दृष्टीने एक चमकदार कामगिरी केली आहे. या पथकाने दुर्मिळ कासवाची तस्करी करणाNया दोघांना शिताफीने पकडून त्यांच्याकडून अडिच लाख रुपये किमतीचे जिवंत कासव हस्तगत करण्यात आले आहे. कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली गावाजवळ ही कारवाई करण्यात आली.

वन्यजीवांची तस्करी करत असलेल्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना दिल्या होत्या. दरम्यान, वाठार किरोली गावच्या हद्दीत दोन इसम एका कासवाची तस्करी करत असल्याची टीप पाटील यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने त्यांनी पथकाला संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. 

त्यानुसार पोलीस हवालदार विनोद गायकवाड यांनी पोलीस पथकासह वाठार किरोली गावच्या हद्दीत संशयित इसमांचा शोध घेतला असता संशयित दोन इसम हे वाठार गावच्या हद्दीत वाठार - आर्वी रस्त्याच्या कडेला बेघर वस्तीनजीक पाण्याच्या टाकीजवळ हातात पिशवी घेऊन संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले. पथकाने त्यांना ताब्यात घेऊन पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये अडिच लाख रुपये किमतीचे दुर्मिळ जिवंत कासव आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, ते कासव विकण्यासाठी फिरत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडून ते कासव हस्तगत करण्यात आले आहे.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या