नाबार्डचे अध्यक्ष डॉ. जी. आर. चिंताला कामकाजाने प्रभावित
सातारा : नाबार्ड व केंद्र शासनाशी संबंधित जिल्हा बँकांच्या अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिष्टमंडळाने नाबार्डच्या मुंबई येथील मुख्यालयास नुकतीच भेट दिली. सातारा जिल्हा बँकेचे कार्य देशातील सहकारी बँकांसाठी आशादायक असल्याचे गौरवोद्गार नाबार्डचे अध्यक्ष डॉ. जी. आर. चिंताला यांनी यावेळी व्यक्त केले.
शिष्टमंडळामध्ये ज्येष्ठ संचालक व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर, बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोंसले, संचालक राजेश पाटील - वाठारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे सहभागी होते. नाबार्ड व केंद्र शासनाच्या धोरणांबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकांना येणाNया अडचणींच्या अनुषंगाने या सभेमध्ये सकारात्मक चर्चा करण्यात आली.
पश्चिम महाराष्ट्रात ऊस पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पीक कर्जाची वेळेत परतफेड करणाNया शेतकNयांना केंद्र व राज्य शासनाकडून जास्तीत जास्त ३६५ दिवसांचे व्याज अनुदान दिले जाते. मात्र ऊस पिकाचा कालावधी १४ ते २२ महिन्यांचा असल्याने संपूर्ण पीक उत्पादन कालावधीसाठी व्याज अनुदान देण्याबाबत नाबार्डने अनुकुलता दर्शविली. तसेच केंद्र शासनाच्या व्याज परताव्यामध्ये १ टक्का वाढ करून तो जिल्हा बँकांसाठी ३ टक्के करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही डॉ. चिंताला यांनी दिली. प्राथमिक विकास सेवा संस्थांच्या सक्षमीकरणासाठी नाबार्डच्या सीडीएफ योजनेअंतर्गत जास्तीत जास्त संस्था समाविष्ट करण्याची सूचना त्यांनी केली. विकास सेवा संस्थांचे कामकाज संगणकीकृत करण्यासाठी नाबार्ड केंद्र व राज्य शासनामार्पâत निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट केले. विकास सेवा संस्था या सहकारी बँकिंग त्रिस्तरीय रचनेतील अत्यंत महत्वपूर्ण घटक असल्याने त्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका व विकास सेवा संस्थांची परिषद आयोजित करण्यासाठी सातारा जिल्हा बँकेने पुढाकार घ्यावा व त्यासाठी नाबार्डमार्पâत सर्वतोपरी सहाय्य केले जाईल असे त्यांनी सांगितले.
रामराजे नाईक - निंबाळकर यांनी सातारा जिल्हा बँक जिल्ह्यातील शेतकरी, विकास सेवा संस्था, अन्य सहकारी संस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी करीत असलेल्या कामकाजाची माहिती दिली. पीक कर्ज पुरवठा करताना पीक कर्ज दर ठरविण्याचे अधिकार जिल्हा बँकेच्या अध्यक्षतेखालील शेती तज्ञ समितीसच असावेत, असे त्यांनी सूचित केले. जिल्ह्यातील औद्योगिकीकरणाचा विचार करून या उद्योगांना कर्ज पुरवठा करण्यास जिल्हा बँकांना परवानगी द्यावी असे नमूद केले. बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी बँकेने विकास संस्थांच्या व्यवसाय वाढीसाठी केलेले प्रयत्न विषद केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी बँकेने डिजीटल बँकिंगमध्ये केलेली प्रगती, मोबाईल बँकिंग, आयएमपीएस, भारत बिल पेमेंट सिस्टिम, युपीआय अंमलबजावणीची माहिती दिली. जिल्ह्यातील शेतकNयांचे व्याज परतावा प्रश्न, विकास सेवा संस्थांच्या अडचणी, जिल्हा बँकांना पीक कर्ज व्यवहारात होत असलेले नुकसान, सोसायटी संगणकीकरणाची गरज, व्यक्ती थेट कर्ज पुरवठा, साखर कारखाना कर्ज पुरवठ्यामधील अडचणी, प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्हा बँकांचा समावेश इत्यादी अडचणी मांडल्या. याप्रसंगी नाबार्डचे मुख्य सरव्यवस्थापक (देखरेख विभाग) एल. आर. रामचंद्रन व मुख्य सरव्यवस्थापक (पुनर्वित्त विभाग) सी. एस. रघुपती उपस्थित होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या