कोरेगावमध्ये उभारलेल्या १०० खाटांच्या कोविड सेंटरचे लोकार्पण | Latest Marathi News


आमदार महेश शिंदे यांच्या दातृत्वामुळे लोकांना मोठा दिलासा
 

सातारा : कोरोनाच्या गंभीर महामारीत आपल्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला सहन कराव्या लागत असलेल्या यातना पाहून कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या वतीने जीतराज मंगल कार्यालय येथे उभारण्यात आलेल्या १०० खाटांच्या कोविड सेंटरचे लोकार्पण गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून कोरेगाव - खटावमधीलही रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे अनेकांना बेड मिळत नसल्याने रूग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची प्रचंड हेळसांड होत आहे. आपल्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला सहन कराव्या लागत असलेल्या यातना पाहून आमदार महेश शिंदे यांचीही घालमेल सुरू होती. या जनतेला दिलासा मिळावा या भावनेतून त्यांनी या कोविड सेंटरची उभारणी केली आहे. यामध्ये शंभर बेडची व्यवस्था असल्याने लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आमदार शिंदे यांनी कर्तव्य भावनेतून हे कोविड सेंटर लोकांच्या सेवेत अर्पण केले आहे. या माध्यमातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. कोरोनाच्या विरोधातील लढाईत त्यांनी दिलेले हे योगदान लोक विसरणार नाहीत, असे उद्गार शंभूराज देसाई यांनी याप्रसंगी काढले. कार्यक्रमास आमदार महेश शिंदे, कोरेगावच्या नगराध्यक्ष श्रीमती कोकरे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसिलदार रोहिणी शिंदे, गटविकास अधिकारी बोराटे, तालुका आरोग्य आधिकारी जाधव, डॉ. करपे, डॉ. चिवटे, डॉ. काळोखे, विजया घाडगे, रवी साळुंखे, संदिप शिंदे, सुनिल खत्री, किरण बर्गे, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, संग्राम बर्गे आदी उपस्थित होते.


Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या