जिल्ह्यात आणखी ९७३ रूग्णांची वाढ; विक्रमी ९३० डिस्चार्जचा जॅकपॉट | Latest marathi news


सातारा
: जिल्हावासीय सध्या अतिशय नाजूक कालखंडातून जात आहेत. जीव कसा वाचवायचा हाच प्रत्येकाला सतावणारा प्रश्न आहे. दररोज वाढत चाललेल्या रूग्णसंख्येने आणि जवळची माणसे गमावत असल्यामुळे चिंता आहे. मंगळवारी रात्री उशीरा हाती आलेल्या वृत्तानुसार आणखी ९७३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २६ हजार ४४९ पर्यंत जावून पोहोचला आहे. मात्र त्याचवेळी दिलासादायक बातमी म्हणजे जिल्ह्यात विविध रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या ९३० नागरिकांना आज दिवसभरात घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनावर मात करून घरी परतलेल्यांची एवूâण संख्या १६ हजार ५२४ झाली आहे.

दरम्यान, स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील २०, कराड उपजिल्हा रुग्णालय ४४, फलटण उपजिल्हा रुग्णालय ५३, कोरेगाव ८०, वाई १२६, खंडाळा ७३, रायगाव ८०, पानमळेवाडी ११८, महाबळेश्वर ८५, खावली ३३ व कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड १७१ अशा एकूण ८८३ जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

सातारा जिल्हा कोरोना 

  • घेतलेले एकूण नमुने - ५८,२५२
  • एकूण बाधित - २६,४४९
  • घरी सोडण्यात आलेले - १६,५२४ 
  • मृत्यू - ७२५
  • उपचारार्थ रुग्ण - ९,२००

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या