मृत्यूचे तांडव भयकारी; विक्रमी ३५ जण झाले कोरोनाची शिकार | Latest Marathi News


जिल्ह्यात नवीन ६२९ रूग्ण वाढले, २६६ जणांना डिस्चार्ज

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचे संकट अधिक गडद झाले आहे. मृत्यूचे तांडव भयकारी झाले आहे. काल रात्रीपासून जिल्ह्यातील एका दिवसातील विक्रमी ३५ लोक कोरोनाची शिकार झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा थरकाप उडाला आहे. रविवारी रात्री जिल्ह्यातील आणखी ६२९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

शनिवारी रात्री जिल्ह्यात उच्चांकी १०८६ जणांचे अहवाल बाधित आले होते. त्यामध्ये एकट्या कराड तालुक्यातील २८७, तर सातारा तालुक्यातील २५३ रूग्णांचा समावेश आहे. यावरून सातारा, कराडमधील कोरोना संकटाच्या दाहकतेची कल्पना येऊ शकते. त्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच आज २४ तासातील सर्वाधिक ३५ बाधितांच्या मृत्यूचे वृत्त आल्याने जिल्हा पुरता हादरला. दिवसेंदिवस रूग्ण व बळी वाढत असल्याने लोक दहशतीखाली आहेत.

दरम्यान, विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या २६६ नागरिकांना आज दिवसभरात घरी सोडण्यात आले असून २४६ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.


Get all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या