सातारा : वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यामधील रुग्णालयांमध्ये आमदार मकरंद पाटील यांच्या फंडातून १८० ऑक्सिजन बेड वाढविण्यात येणार आहेत. याचबरोबर ३ रुग्णवाहिकाही दाखल होणार असल्याची माहिती प्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांनी दिली.
प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व तालुक्यात १८० ऑक्सिजन बेड वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये वाई ८० तर खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यात ५० खाटा वाढवण्यात येणार आहेत. वाई ग्रामीण रुग्णालयात ३० बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी सर्व अद्ययावत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. याचबरोबर कवठे आरोग्य केंद्रात कोविल सेंटर तयार करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने अहवाल तयार करण्यात आला आहे. हे सेंटर ऑक्सिजन बेडयुक्त असणार आहे.
बेडस् वाढवण्याबरोबरच रुग्णवाहिकाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच नवीन कोविड सेंटरसाठी १०० ऑक्सिजन सिलेंडर पुरविण्यात येणार आहेत. नागरिकांनी काही लक्षणे आढळल्यास त्वरित माहिती द्यावी. अनेकदा वेळेवर माहिती न दिल्याने बेड मिळत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन संगीता राजापूरकर यांनी केले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या