पाटणमध्ये कोविड सेंटरसाठी सत्यजीतसिंह पाटणकर यांचा मदतीचा हात | Latest Marathi News


ऑक्सिजन बेडसाठी येणारा खर्चही उचलण्याची तयारी 

पाटण : पाटण तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची ऑक्सिजन बेडअभावी होणारी गैरसोय व त्यामुळे काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. यासाठी आता आम्ही आमच्या सहकारी व अन्य संस्थांमार्फत ऑक्सिजन बेडसाठी येणारा खर्च उचलण्यासाठी तयार आहोत. याशिवाय आमचे खाजगी मंगल कार्यालय, स्टेडियम या ठिकाणी कोरोना केअर सेंटर सुरू करण्यासाठी आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील. यासाठी प्रशासनाने तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पाटण विधानसभा मतदारसंघात सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये ज्या पटीत रुग्णांची संख्या वाढत आहे किंवा उपचारादरम्यान होणारे मृत्यू याचा मृत्यूदर हा चिंताजनक आहे. सध्या आपल्या मतदारसंघासह जिल्हाभर झपाट्याने वाढणारी रुग्ण संख्या व त्यासाठी असलेल्या तोकड्या आरोग्य सुविधांमुळे व वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. शासन, प्रशासन आपाल्या परीने आवश्यक त्या उपाययोजना राबवत असले तरी त्याच्या मर्यादांमुळेही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. 

ढेबेवाडी येथे ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध होतेय ही चांगलीच बाब आहे. त्याचवेळी आता पाटण शहर व परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनले आहे. येथील अन्य सुविधा लक्षात घेता आपल्या समाजकल्याण विभागाच्या नूतन वसतिगृहातील कोरोना केअर सेंटरमध्ये मोठ्या हॉलमध्ये आवश्यक त्या प्रमाणात ऑक्सिजन बेडची सुविधा तयार करण्यात यावी. यासाठीचा खर्च जर शासनाकडून तातडीने उपलब्ध होत नसेल तर आम्ही आमच्या सहकारी, खाजगी संस्थांमार्फत हा सर्व खर्च करायला तयार आहे. मात्र यापुढे आपल्या मतदारसंघातील कोणाचाही मृत्यू हा व्यवस्थेचा बळी ठरू नये यासाठी आता आपल्याला ही ठोस पावले उचलावीच लागतील. त्यासाठी आम्ही आपणास सर्वतोपरी सहकार्य करायला तयार आहोत. याशिवाय आमच्याकडील पाटण स्पोर्टस स्टेडियम, खाजगी मंगल कार्यालय येथेही कोरोना केअर सेंटर होवू शकते. ते आपण अधिग्रहण करू शकता. या मागण्यांचा तातडीने विचार होवून याबाबत आम्हाला आपल्याकडून मान्यता मिळाली तर तातडीने त्याची व्यवस्था करता येईल, असेही सत्यजितसिंह पाटणकर यांनी म्हटले आहे.

यावेळी तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस सुभाषराव पवार आदी मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या