चोवीस तासात ८९८ रूग्णांची भर; तर ७६१ जणांची घरवापसी
सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून सोमवारी रात्री उशीरा आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात कोरोनाचे ८९८ रूग्ण वाढले आहेत. यासह जिल्ह्यातील बाधितांची संख्या २५ हजारपार झाली आहे. अर्थात दहशतही त्या प्रमाणात वाढली आहे. त्याचप्रमाणे विविध रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या ७६१ नागरिकांना आज दिवसभरात घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान, स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील १६, कराड उपजिल्हा रुग्णालय ३१, फलटण उपजिल्हा रुग्णालय ६८, कोरेगाव ६१, वाई १६०, खंडाळा १४७, रायगाव १२१, पानमळेवाडी ८०, मायणी २१४, महाबळेश्वर ४९, पाटण ४१, दहिवडी ५०, तळमावले २५ व कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड २४६ अशा एकूण १२०९ जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा जिल्हा कोरोना
- घेतलेले एकूण नमुने - ५७,३६९
- एकूण बाधित - २५,४७६
- घरी सोडण्यात आलेले - १५,५९४
- मृत्यू - ६९०
- उपचारार्थ रुग्ण - ९,१९२
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या