मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतील मोहिमेचा राज्यभर शुभारंभ
सातारा : कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात आजपासून 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत सातारा जिल्ह्यातील प्रत्येक घराचा सर्व्हे करण्यात येणार असून कोरोना संसर्गापासून बचाव कसा करावा व आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याची माहिती सांगण्यात येणार आहे. नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन घरी येणाNया आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
ही मोहीम २४ ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. कुटुंबातील व्यक्तीचे वय, आरोग्याची परिस्थिती, ऑक्सिजन लेवल यांची तपासणी करण्यात येणार आहे. याचबरोबर कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मास्कचा वापर, सार्वजनिक ठिकाणी व गप्पा मारताना सुरक्षित अंतर ठेवणे, जेवण करताना सुरक्षित अंतर ठेवणे याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या मोहिमेचा उपयोग होईल, असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितले.
६ लाख ८० हजार कुटुंबांना भेटी
आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपली आहे या भावनेतून कोरोना संसर्गापासून बचाव कसा करायचा याबाबत गावागावात जनजागृती करण्यात येणार आहे. मास्क वापरणे, कामाशिवाय घराबाहेर न पडणे, सतत हात धुणे, जिथे हात धुण्याची व्यवस्था नसेल अशा ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करणे याची जागृती व्हावी हा या मोहिमेचा उद्देश आहे. या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात वेगवेगळी पथके तयार करण्यात आली असून जिल्ह्यातील ६ लाख ८० हजार कुटुंबांना भेटी देण्यात येतील, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.
घरोघरी जाणाऱ्या पथकामध्ये तीन जणांचा समावेश असून त्यांना ‘कोरोना दूत’ म्हणून संबोधण्यात येणार आहे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची खरी उत्तरे द्यावीत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, होम आयसोलेशनमध्ये आहेत त्यांनी काय काळजी घ्यावी तसेच कोरोनातून बरे झाल्यानंतर काय काळजी घ्यावी याची सर्व माहिती मोहिमेंतर्गत सांगण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील युवक - युवतींनी या मोहिमेत सहभागी होऊन एक सामाजिक दायीत्व म्हणून सहकार्य करावे, असे आवाहनही शेखर सिंह यांनी केले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या