सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने घालण्यात आलेले निर्बंध काहीसे शिथील करण्यात आले आहेत. मात्र सर्वत्र सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत अनास्था दिसून येत आहे. त्यामुळे आता दुकानांमध्ये गर्दी झाल्याचे निदर्शनास आले तर दंडात्मक कारवाईसह संबंधित दुकात सात दिवस बंद ठेवण्यात येईल. सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. गर्दीमुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाला आळा घालणे व संसर्गात अधिक वाढ होवू न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. या अनुषंगाने सोशल डिस्टन्सिंग व नियमांचे पालन करण्याबाबत विविध प्रकारचे आदेश पारित केलेले आहेत. परंतु अद्यापही सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नसल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शहरी अथवा ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या दुकानांमध्ये जाणाऱ्या ग्राहकांनी एकमेकांमध्ये ६ फुटापेक्षा जास्त अंतर ठेवणे गरजेचे आहे. पण याउलट दुकानात गर्दी केल्याचे निर्दशनास आल्यास ही कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.
नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद कार्यक्षेत्रात (शहरी भाग) ३ हजार रूपये दंड आकारण्यात येईल. तसेच ग्रामपंयाचत कार्यक्षेत्रात २ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. जर कोणत्याही प्रकारच्या दुकानात ग्राहकांनी एकमेकांमध्ये ६ फुटापेक्षा जास्त अंतर न ठेवल्याचे / सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता गर्दी केल्याचे निदर्शनास येईल त्यावेळी संबंधित दुकानदारावर दंडात्मक कारवाई करुन ते दुकान ७ दिवसांपर्यंत सक्तीने बंद करण्यात यईल.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या