सातारा येथे कृष्णातीरी आशालतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार | Latest Marathi News


रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलेल्या 
गुणी अभिनेत्रीला खिन्नपणाने अखेरचा निरोप

Marathi News... सातारा : मराठी चित्रपट व रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री व सुरेल सूर लाभलेल्या गायिका आशालता वाबगावकर यांच्या पार्थिवावर आज दुपारी १ वाजता संगममाहुली (सातारा) येथे कृष्णातीरावर असलेल्या कैलास स्मशानभूमीत कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करत आवश्यक ती काळजी घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. लाखो मराठी चित्रपट - नाट्यरसिकांच्या हृदयावर प्रदीर्घकाळ अधिराज्य गाजवलेल्या या गुणी अभिनेत्रीला अत्यंत मर्यादित लोकांच्या उपस्थितीत खिन्नपणाने अखेरचा निरोप देण्यात आला. 

प्रसिध्द अभिनेत्री अलका कुबल यांच्या ‘आई माझी काळूबाई’ मालिकेचे चित्रीकरण सध्या सातारा जिल्ह्यात सुरू होते. त्यात आशालता यांची प्रमुख भूमिका होती. त्यामुळे चित्रीकरणाच्या निमित्ताने आशालता सातारा जिल्ह्यात होत्या. यादरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे सातारा येथील खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे पावणेपाचच्या सुमारास त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. 

दुपारी प्रशासनाच्या माध्यमातून कैलास स्मशानभूमीत आशालता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनेत्री अलका कुबल यांना यावेळी दु:ख अनावर झाले. आशाताई यांच्या सहवासातील आठवणींनी त्यांचा कंठ दाटून आला. अंत्यसंस्कारप्रसंगी समीर आठल्ये, बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे, सुहास पवार, बाळू कदम, सागर पावशे, जगदीप शिंदे आदी उपस्थित होते. याप्रसंगी राजेंद्र चोरगे यांनी अलका कुबल यांना बालाजी ट्रस्टच्या वतीने सांत्वन पत्र दिले.


Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या