रेडिरेकनरच्या दरात वाढ, काय - काय होणार परिणाम ? | Latest Marathi News


सातारा :
कोरोना महामारीमुळे सर्वच उद्योगधंदे अडचणीत सापडले आहेत. बांधकाम व्यवसायालाही जबर फटका बसला आहे. कोट्यवधी रुपये गुंतून पडले असल्याने बांधकाम व्यवसायिक कर्जबाजारी झालेले आहेत. आता त्यात राज्य शासनाने रेडिरेकनरच्या दरात वाढ केल्याचा मालमत्ता खरेदी व्यवहारांवर थेट परिणाम होणार आहे. नवीन मालमत्ता खरेदी आता पहिल्यापेक्षा महाग पडणार आहे. त्यामुळे मालमत्ता खरेदी - विक्री व्यवहारांवर विपरित परिणाम होऊ शकतो, अशी भीती बांधकाम व्यावसायिक व्यक्त करत आहेत.

रेडिरेकनरच्या दरामध्ये वाढ केल्याने बांधकामाचे दर दहा टक्क्यांनी वाढतील, अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. मुद्रांक शुल्कामध्ये राज्य शासनाने नुकतीच मोठी कपात केली होती. ग्रामीण क्षेत्रांमध्ये फक्त दोन टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे, ते पूर्वी पाच टक्के होते. चार टक्के मुद्रांक शुल्क आणि एक टक्का जिल्हा अधिभार असे मिळून पाच टक्के भरावे लागत होते. तर प्रभावक्षेत्र नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या परिसरामध्ये केवळ तीन टक्के मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तेच पूर्वी सहा टक्के आकारले जात होते. त्यामध्ये पाच टक्के मुद्रांक शुल्क आणि एक टक्का पालिका अधिभार यांचा समावेश होता. 

साहजिकच, घर खरेदी तसेच इतर मिळकत खरेदी करताना करताना मुद्रांक शुल्क कमी झाल्याचा फायदा सर्वसामान्यांना तसेच बांधकाम व्यावसायिकांना देखील होत होता. कोरोना महामारीच्या काळात एक तर लोकांची आर्थिक ओढाताण सुरू आहे. अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर उद्योगधंदे कोलमडले आहेत. अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. बांधकाम व्यवसायामध्ये कोट्यवधी रुपये गुंतून पडले असल्याने बांधकाम व्यवसायिक कर्जबाजारी झालेले आहेत. मुद्रांक शुल्क कमी झाल्याने घर खरेदी विक्री व्यवहार सुरू झाले होते, परंतु त्याला म्हणावी तितकी गती नव्हती. आता त्यात रेडीरेकनरचे दर वाढल्याने पुन्हा नवे संकट उभे राहील, अशी भीती बांधकाम व्यावसायिक व्यक्त करत आहेत.

शासनाने एका हाताने दिले आणि दुसऱ्या हाताने काढून घेतले, अशी भावना बांधकाम व्यावसायिक व्यक्त करत आहेत. सध्याच्या घडीला बांधकाम व्यवसायाला बूस्टर डोस देणारा निर्णय राज्य शासनाने घ्यायला हवा होता. ज्या पद्धतीने मूल्यवर्धित कर आकारणीला गेल्या दोन वर्षांमध्ये संधी देण्यात आली होती, त्याचप्रमाणे यंदाच्या कोरोना महामारीमध्ये स्थगिती द्यायला हवी होती, अशी या व्यावसायिकांची मागणी आहे.


Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या