पेट्रोल पंपावरील दरोडा ४२ तासात उघडकीस; जोखमीचे ‘ऑपरेशन’ यशस्वी | Latest Marathi News


सातारा :
पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यात शिवडे गावच्या हद्दीत सोमवारी मध्यरात्री पेट्रोल पंपावर पडलेल्या सशस्त्र दरोड्यातील सर्व संशयितांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते तसेच अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून हे जोखमीचे ऑपरेशन आज यशस्वी केले. दरोडा पडल्यापासून केवळ ४२ तासातच हा गुन्हा उघडकीस आणून पोलीस दलाने ‘तेजस्वी’ कामगिरी केली आहे.   

सोमवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास दोन दुचाकीवरून आलेल्या सहा दरोडेखोरांनी महामार्गालगत असलेल्या एसके पेट्रोल पंपावर रिव्हॉल्वरचा धाक दाखवून रोकड व दोन मोबाईल लंपास केले होते. उंब्रज पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली होती. पोलीस दलाने अत्यंत तत्परतेने तपासाला गती दिली होती. गुन्हा घडल्यापासून संशयितांचा माग काढत अवघ्या ४२ तासांच्या आतच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळत गुन्हा उघडकीस आणला. जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी या यशस्वी ऑपरेशनची माहिती दिली.

आपल्याला संशयितांचे वर्णन मिळाले होते. त्यावरून आम्ही संशयितांचा शोध घेत होतो. त्या सहापैकी एकजण कराडचा रहिवासी आहे. त्याच्याविषयी गोपनीय माहिती मिळाली होती. त्याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याची खात्री झाल्यानंतर त्याच्या हालचालीवर आज दुपारपासूनच आपली टीम करडी नजर ठेवून होती. त्यावरून आपल्याला संशयितांचा ठावठिकाणा लक्षात आला. त्या ठिकाणी उरलेले दरोडेखोर थांबलेले होते. त्यांच्याकडे अग्निशस्त्र असल्याने त्यांना अटक करताना काळजी घेणे आवश्यक होते. या सर्व प्रक्रियेमध्ये आपण स्वत: व अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील उपस्थित होतो. हे ऑपरेशन पार पाडण्यामध्ये कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील व त्यांच्या संपूर्ण टीमचा सहभाग होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर, पोलीस उपनिरीक्षक पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोडसे हेदेखील या कारवाईत सहभागी झाले होते. हे ऑपरेशन कौशल्यपूर्णतेने करायचे असल्याने मुख्यालयाकडून क्यूआरटी व आरसीपीचे सशस्त्र पथक बोलावले होते. आवश्यक दक्षता घेत सर्व संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून हा दरोडा उघडकीस आणला आहे. पुढील तपासाची कारवाई सुरू आहे, अशी माहिती सातपुते यांनी दिली.


Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

  1. मा पोलिस अधिक्षक सौ सातपुते मॅडम तसेच मा अप्पर पो अधिक्षक श्री धीरज पाटील सर मा बी आर पाटील सर आणि सर्व कर्तव्यदक्ष टीमला मनापासुन धन्यवाद।

    उत्तर द्याहटवा
  2. मा पोलिस अधिक्षक सौ सातपुते मॅडम तसेच मा अप्पर पो अधिक्षक श्री धीरज पाटील सर मा बी आर पाटील सर आणि सर्व कर्तव्यदक्ष टीमला मनापासुन धन्यवाद।
    श्री एस जे स्वामी , क्राईम इन्फफमेशन ब्युरो सातारा जिल्हा

    उत्तर द्याहटवा