राज्यात साडेबारा हजार रिक्त पदांसाठी ‘बंपर’ पोलीस भरती | Latest Marathi News


मुंबई :
राज्यात साडेबारा हजार रिक्त पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या बंपर पोलीस भरतीमुळे हजारो तरूणांना पोलीस दलातील सेवेची दारे खुली होणार असून पोलिसांवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

पोलीस दलात पोलीस शिपाई संवर्गातील १२ हजार ५३८ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बैठकीनंतर प्रसार माध्यमांना दिली. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस भरती होत आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील तरूण - तरूणींना पोलीस भरती होण्याची मोठी संधी प्राप्त झाली आहे, असे ते यावेळी बोलताना म्हणाले.

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले अन्य निर्णय

  • राज्यात कृषी महोत्सव योजना राबवण्यास मान्यता.
  • स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना संपूर्ण राज्यात राबवण्याचा निर्णय.
  • जालना जिल्ह्यातील अंबड येथे जिल्हा व तालुका न्यायालय स्थापना व पद निर्मिती करण्यास मान्यता.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या