शिराळच्या कदम कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला वेगळा आदर्श
विपूल शहा / शिराळा : सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील अंबामाता उद्योग समूहाची मुहूर्तमेढ रोवून तो नावारूपाला आणणाNया सौ. आनंदीबाई बळवंत कदम यांचे सोमवारी (दि. १४) कोरोनाने निधन झाले. त्यांच्या स्मृती जागृत रहाव्यात म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी सामाजिक कर्तव्य बजावत त्यांची रक्षा पाण्यामध्ये विसर्जित न करता आंब्याचे रोप लावून त्या रोपाला घालून कोरोना काळातही वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
विश्वास कारखान्याचे संचालक विश्वास उर्पâ बंडा कदम यांच्या व अंबामाता उद्योग समुहाच्या उभारणीत व जडणघडणीत आनंदीबाई कदम यांनी पतीच्या साथीने मोलाचे योगदान दिले. दोन्ही मुलांना व्यावसायिक क्षेत्रात भक्कम उभे करत तालुक्यात बांधकाम व्यावसायिक म्हणून नावारूपास आणले. बंडा कदम यांच्या राजकीय, सामजिक व व्यावसायिक तर संजय कदम यांच्या शेती क्षेत्रासाठी त्या नेहमी आधार बनून पाठीशी उभ्या राहिल्या. महिलांमध्ये त्यांना आदराचे स्थान होते.
अशा अनोख्या पध्दतीने रक्षाविसर्जन करताना माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कदम, दिलीप कदम, राम कदम, हरिभाऊ कवठेकर, आकाराम पाटील, माजी सरपंच हिंदुराव पाटील, नारायण शिंदे, संजय कदम, बाबासाहेब शिंदे, तानाजी गायकवाड, ऋतुराज कदम, प्रितेश कदम आदी उपस्थित होते. दरम्यान, आनंदीबाई कदम यांच्या पार्थिवावर शिराळा येथील मोरना धरण रस्त्याला असलेल्या स्मशानभूमीत प्रमोद पवार, विनायक गायकवाड, अमोल कदम, भिकू सावंत यांनी पीपीई किट घालून अंत्यविधी पार पाडले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या