जिल्ह्यात ६८३ जण पॉझिटिव्ह; घटत्या संख्येने दिलासा | Latest Marathi News


५७६ नागरिकांना डिस्चार्ज, तर ८२२ नमुने पाठवले तपासणीला

Marathi News... सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या घटत असल्याने जिल्हावासीय सुखावत आहेत. दररोजच्या उच्चांकी रूग्णसंख्येमुळे धास्तावलेल्या जनतेला काहीसा दिलासा देणारी आकडेवारी सध्या येऊ लागली आहे. आज रात्री उशीरा आलेल्या अहवालानुसार जिल्ह्या कोरोनाचे ६८३ रूग्ण वाढले आहेत. तसेच जिल्ह्यात विविध रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या ५७६ नागरिकांना आज दिवसभरात घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील १०४, कराड १९, फलटण उपजिल्हा रुग्णालय ४१, कोरेगाव ७६, वाई ९१, खंडाळा ४४, रायगाव ८९, पानमळेवाडी ११५, मायणी १४, महाबळेश्वर ६०, दहिवडी १६, खावली १७ व कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड १३६ अशा एकूण ८२२ जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

सातारा जिल्हा कोरोना

  • घेतलेले एकूण नमुने - १३९७७६
  • एकूण बाधित - ३६६१७
  • घरी सोडण्यात आलेले - २७०७३
  • मृत्यू - १११७
  • उपचारार्थ रुग्ण - ८४२७

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या