रूग्णालयांनी उपचारासाठी ३४ लाख जादा घेतल्याचे निष्पन्न
Marathi News... सातारा : कोरोना संकटाच्या काळात रुग्णांवर केलेल्या उपचारांसाठी अवाजवी पध्दतीने लाखोंची बिले आकारून लुटमार करणाऱ्या रूग्णालयांना प्रशासनाने जबरदस्त दणका दिला आहे. अशा भरमसाठ बिलांच्या तपासणीसाठी नियुक्त केलेल्या पथकाने १ हजार ११२ कोरोना बाधितांच्या उपचारांच्या बिलांची तपासणी केली असता १२२ जणांची बिले अवाजवी आकारण्यात आल्याचे निदर्शनास आले. या १२२ रुग्णांकडून संबंधित रूग्णालयांनी तब्बल ३३ लाख ९४ हजार ८५६ रुपये जास्तीचे आकारल्याचे निष्पन्न झाले आहे. ही रक्कम संबंधितांना परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोरोना ( कोविड - १९) बाधित रुग्णांकडून रुग्णालये भरमसाठ बिले वसूल करत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे येत होत्या. या रुग्णालयांकडून रुग्णांना देण्यात येणारी बिले शासनाने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे देण्यात येतात की नाही याची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश काढून रुग्णालयनिहाय देयकाच्या तपासणीसाठी पथके तयार केली आहेत. प्रत्येक पथकात एक नोडल अधिकारी व एका ऑडिटरची नेमणूक करण्यात आलेली आहे.
विविध रुग्णांलयाकडून १२२ कोरोना बाधितांकडून ९६ लाख १० हजार ७७० रुपये आकारण्यात आलेले होते. जिल्हाधिकारी यांनी नेमणूक केलेल्या पथकांकडून रुग्णालयनिहाय बिलांची तपासणी करण्यात आली. तपासणी केल्यानंतर ३३ लाख ९४ हजार ८५६ रुपये इतके देयक कमी करुन ६२ लाख ७३ हजार ५५४ रुपये इतकेच उपचाराचे देयक देय करण्यात आलेले आहे.
यापुढेही रुग्णालयांच्या तपासणीसाठी तयार करण्यात आलेल्या पथकांकडून कोरोना बाधितांवर केलेल्या उपचारांच्या देयकांची तपासणी वेळोवेळी करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या