पोलीस निरीक्षकांच्या दालनातच आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न | Latest Marathi News


मनाई असताना शहरात आल्याने आणले होते पोलीस ठाण्यात

Marathi News... सातारा : मारामारीसारख्या गंभीर गुन्ह्यात न्यायालयाने वाई शहरात येण्यास मनाई केली असताना शहरात आलेल्या संशयिताला पकडून चौकशीकामी पोलीस ठाण्यात आणले असता त्याने पोलीस निरीक्षकांच्या टेबलावर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने पोलीस ठाण्यात एकच गडबड उडाली. सागर भाऊराव मेश्राम (रा. गंगापुरी, वाई) असे संशयिताचे नाव आहे.

एक महिन्यापूर्वी वाई पोलिसांनी सागरला पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. जिल्हा सत्र न्यायालयाने वाई शहरात येण्यास बंदी घालत मनाई आदेश करून त्याचा जामीन मंजूर केलेला होता. 

दरम्यान, तो वाईमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस ठाण्याचे गुन्हे अन्वेषणचे श्रावण राठोड, होमगार्ड प्रणित येवले यांना गस्त घालत असताना तो दुपारी गंगापुरीत फिरताना आढळून आला. त्यावेळी त्यांनी विचारले असता तो त्यांच्यावरच दादागिरी करू लागला. तुम्हाला काय करायचे, कोर्ट व मी बघून घेईन अशी दुरूत्तरे त्याने दिली. 

त्यामुळे त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे त्यांच्या कक्षामध्ये त्यास विचारपूस करण्यासाठी हजर केले असता, त्याने गोंधळ घालत स्वत:चे डोके टेबलावर आपटले. त्याने अचानक घेतलेल्या या पवित्र्याने सगळ्यांची पळापळ झाली. तेथेच असलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. 

त्याच्यावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे तपास करत आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या