'आई माझी काळूबाई'च्या चित्रीकरणादरम्यान झाला होता कोरोनाचा संसर्ग
Marathi News... सातारा : सोनी मराठी वाहिनीवरील 'आई माझी काळूबाई' मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान कोरोनाचा संसर्ग झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री व गायिका आशालता वाबगावकर यांचे आज पहाटे येथील खाजगी रूग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी त्या ७९ वर्षांच्या होत्या. आपले संपूर्ण आयुष्य चित्रपट, नाट्य क्षेत्रासाठी वाहिलेल्या या गुणी अभिनेत्रीची चित्रीकरणावेळीच संसर्ग होऊन झालेली एक्झिट चित्रपट क्षेत्रासह महाराष्ट्राला चटका लावून गेली आहे. ‘तू तर चाफेकळी’ हे त्यांनी गायलेले गीत अजरामर आहे.
मराठी चित्रपट सृष्टीत ‘आशालता’ या नावाने त्या ओळखल्या जात होत्या. सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी सध्या अभिनेत्री अलका कुबल यांच्या ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेचे चित्रीकरण सुरू असून त्यामध्ये आशालता यांची भूमिका असल्याने त्या साताऱ्यात होत्या. चित्रीकरणादरम्यान मालिकेच्या सेटवरील वीसहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये आशालता यांचा समावेश होता. जास्तच अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. कालपासून त्यांची प्रकृती आणखीनच खालावली होती. अखेर आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अनपेक्षित एक्झिटचा सर्वांनाच जबर धक्का बसला आहे. साताNयात असताना त्यांच्यावर ही दुर्दैवी वेळ आली ही बाब जिल्ह्यातील कलावंत, तंत्रज्ञांच्या जिव्हारी लागली आहे.
आशालता या मूळच्या गोव्यातील होत्या. कोकणी आणि मराठी चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. त्यांनी आतापर्यंत मराठी आणि हिंदी अशा सुमारे १०० हून अधिक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. ‘गुंतता हृदय हे, ‘वाऱ्यावरची वरात’, 'छिन्न' आणि ‘महानंदा' मधील त्यांच्या भूमिका रसिकांच्या स्मरणात आहेत. संगीत नाटक ‘मत्स्यगंधा’च्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीवरही अभिनयाचा ठसा उमटवला. तर बासू चटर्जी यांच्या ‘अपने पराये’या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याच चित्रपटातील सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्म फेअरसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. मराठी चित्रपट सृष्टीत उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नवNयाला, वहिनीची माया हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते. संगीतावर आधारित ‘गर्द सभोवती’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे त्यांनी संगीताचे धडे गिरवले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या