शेतकरी - कामगार देशोधडीला लागणार; संघटनांंचा आरोप
Marathi News... सातारा : सरकारने घाईघाईत कामगार दुरुस्ती विधेयक आणि कृषी विधेयक पाशवी बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतले आहे. या दोन्ही विधेयकांमुळे शेतकरी व कामगारांचे नुकसान होणार आहे. शेतकरी देशोधडीला लागणार असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य संघटनांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषी विधेयकाची प्रत फाडून निषेध व्यक्त केला.
या विधेयकानुसार हमीभाव शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्यामुळे कवडीमोल किमतीत पीक विकावे लागणार आहे. त्यामुळे देशभर या विधेयकाविरोधात आवाज उठवला जात आहे. सातारा येथेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने या विधेयकांचा निषेध करण्यात आला. या दोन्ही विधेयकाच्या प्रती फाडण्यात आल्या. सरकारने ज्या पद्धतीने हे विधेयक मंजूर करून घेतले त्याचा विरोधही यावेळी करण्यात आला. हे विधेयक शेतकरी व कामगारांच्या विरोधात असून हे विधेयक मागे घ्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुन साळुंखे, रमेश पिसाळ, कॉ. असलम तडसरकर, संजय जाधव, हेमंत मोरे, विक्रांत पवार, कॉ. शंकर पाटील, विष्णू घाडगे व शेतकरी उपस्थित होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या