नागठाणेत किरकोळ कारणावरून धुमश्चक्री; महिला जखमी | Latest Marathi News


शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

Marathi News... सातारा : किरकोळ कारणावरून झालेल्या वादावादीचे पर्यवसान हाणामारीत झाल्याची घटना सातारा तालुक्यातील नागठाणे येथे घडली. या धुमश्चक्रीत डोक्यात फरशीचा तुकडा घातल्याने एक महिला जखमी झाली. याप्रकरणी सहा जणांवर दांपत्याला शिवीगाळ व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वैभव दिलीप पवार, दिलीप वसंत पवार, वैष्णवी दिलीप पवार, वैभवचे मामा, मामी, आजी (पूर्ण नाव माहीत नाही. सर्व रा. हिराई गोल्डन सिटी, नागठाणे, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. सुनील सुदाम ढाकणे (मूळ रा. दत्तनगर, ता. शिरूर कासार, जि. बीड, सध्या रा. हिराई गोल्डन सिटी, नागठाणे, ता. सातारा) यांनी याबाबत बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

सुनील ढाकणे यांच्या घरासमोरील खांबावरील बल्ब गेल्यामुळे स्ट्रीट लाईट बंद करण्याच्या कारणावरून हा वाद झाला. त्यात वैभवने सुनील ढाकणे यांच्या पत्नीच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारून जखमी केले. बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस नाईक राजू शिंदे अधिक तपास करत आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या