ऑनलाईन अभ्यासाचा ताण न घेता आनंददायी शिक्षण घेण्याचे आवाहन
Marathi News... कराड : ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असलेला मोबाईल आर्थिक ओढाताणीमुळे घेता येत नसल्याने ओंड (ता. कराड) येथील दहावीतील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण सातारा जिल्हाच नव्हे, तर राज्यही हादरले आहे. आज जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी तातडीने संबंधित मुलीच्या घरी सांत्वनपर भेट दिली.
ओंड येथील पंडित गोविंद वल्लभ पंत विद्यालयात दहावीत शिकणाऱ्या साक्षी पोळ (वय १५) या मुलीने आत्महत्या केल्यानंतर माध्यमांमधून या घटनेतील वास्तव समोर आले आणि सर्वचजण हादरून गेले. या पार्श्वभूमीवर आज क्षीरसागर यांनी ओंडला धाव घेतली. साक्षीच्या घरी भेट दिल्यानंतर त्यांनी गोविंद वल्लभ पंत विद्यालयासही भेट दिली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
जिल्ह्यात कोरोनाच्या काळात सुरु असलेल्या ऑनलाईन अभ्यासाचा पालक, विद्यार्थी यांनी कसलाही ताण न घेता आनंददायी शिक्षण घ्यावे, आपल्याकडे स्मार्ट फोन नसला तरी शासनाने सुरु केलेल्या पर्यायी अभ्यासक्रमाचा वापर करुन शिक्षणाच्या प्रवाहात रहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी उपशिक्षणाधिकारी श्रीकांत जगदाळे, गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर, विस्तार अधिकारी नितीन जगताप, सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सचिन नलवडे, निमंत्रक जगन्नाथ कुंभार, तालुका अध्यक्ष सुधाकर चव्हाण, संघाचे राज्य हिशोबनीस भरत मोजर उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात शाळानिहाय केलेल्या सव्र्हेमध्ये ६३ टक्के पालकांकडे स्मार्ट फोन आहेत अशी माहिती मिळाली. ३२ टक्के पालकांकडे स्मार्ट फोन नाहीत, तर ५ टक्के पालकांकडे मोबाईल, टीव्ही काही नाही. अशा मुलांनी आपले मित्र, मैत्रीण यांच्याकडे जावून अभ्यास समजावून घेवून पुस्तकातील अभ्यास करावा. विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात रहावेत यासाठी अनेक पर्यायी व्यवस्था करण्यात आल्या आहेत.
दूरदर्शनवर टीलीमिली कार्यक्रम, युट्यूब चॅनेल, जिओ टीव्ही, दिक्षा अॅप, शिक्षण उपसंचालक यांनी सुरु केलेला ‘शाळा बंद शिक्षण सुरु’ या उपक्रमाची लिंक दररोज पाठवली जाते. त्यावरसुध्दा अभ्यास दिला जातो, असे क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्याकडील पाठयपुस्तकांचे वाचन करुन स्वयंअध्ययन करावे व शिक्षण सुरु ठेवावे. शंका आल्यास आपले विषय शिक्षक यांना साध्या फोनवरुन विचारून शंकेचे निरसण करुन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या