कामकाजात सुधारणा न झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई - नाईक
शिराळा : रुग्ण कोणत्याही प्रकारचा असो, त्याच्यावर यंत्रणेकडून उपचार व्हायलाच हवेत. उपचार केले गेले नाहीत अथवा उपचारांअभावी रुग्ण दगावला असे घडता कामा नये. उपचारांबाबत शिराळा उपजिल्हा रुग्णालयामध्ये हेळसांड होत असल्याबाबत नागरिकांतून तक्रारी येत आहेत. याची गंभीर दखल घेतली असून तातडीने कामकाजात सुधारणा न झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करू, असा इशारा आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिला आहे.
शिराळा तहसील कार्यालयात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या राज्य शासनाने सुरू केलेल्या अभियानाची सुरूवात आमदार नाईक यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी योगेश पाटील, तहसीलदार गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन अनेक उपाययोजना करीत आहे. मागेल ती गोष्ट आरोग्य विभागाकडून व जिल्हा पातळीवरून पुरविण्यात येत आहे. कोविड केंद्रे, ऑक्सिजन प्लँट उभारण्यात येत आहेत. व्हेंटिलेटर पुरविण्यात येत आहेत. तरीही रुग्णांवर उपचार करण्यात शिराळा उपजिल्हा रुग्णालयाकडून हेळसांड होत आहे. अनेक नागरिकांनी तशा तक्रारी केल्या आहेत. ही बाब गंभीर आहे, असे आमदार नाईक म्हणाले. उपचार केले गेले नाहीत अथवा उपचारांअभावी रुग्ण दगावला, असे घडता कामा नये. ज्या गोष्टी अथवा यंत्रणा कमी पडत असल्यास सांगा, आम्ही त्या गोष्टी उपलब्ध करुन देऊ, पण उपचार करा अशा शब्दात त्यांनी आरोग्य यंत्रणेला सज्जड दम दिला.
प्रांताधिकारी पाटील यांनीही उपजिल्हा रुग्णालयाच्या कामकाजावर ताशेरे ओढले. कारणे सांगू नका. फक्त आकडेवारी सांगितली म्हणजे झाले, असे नाही. बेड उपलब्ध नाहीत हे कारण चालणार नाही. एवढे प्रशस्त रुग्णालय बांधले आहे. संशयित व इतर रुग्णांवरील उपचारासाठी स्वतंत्र कक्ष करा. ऑक्सिजन आणखी हवा असल्यास मागून घ्या. २४ तासात कधीही फोन करा. लागणाNया वस्तू उपलब्ध करून देवू, असे त्यांनी सांगितले. प्रारंभी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एन. एम. घड्याळे यांनी स्वागत केले. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण अधिकारी शिल्पा पाटील, नगराध्यक्षा सौ. अर्चना शेटे, नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश पाटील, डॉ. जे. के. मोमीन, डॉ. डी. बी. निर्मळे, डॉ. मनोज महिंद आदी उपस्थित होते.
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेमध्ये शिराळा तालुक्यातील ३६ हजार ३६६ कुटुंंबातील १ लाख ५९ हजार ४३० नागरिकांची दोन वेळा आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी आरोग्य विभागाने १०९ टीम बनविल्या आहेत."
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या