सातारा : सातारा जिल्ह्यात चेन स्नॅचिंग, सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने सोने लुबाडणारी, घरफोडी, दुचाकी, मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. त्यांच्याकडून ४ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांसह दुचाकी, मोबाईल व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
सातारा शहर व जिल्ह्यामध्ये एकट्या फिरणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने चोरण्याच्या घटना मागील काही महिन्यांपासून सातत्याने घडत होत्या. दुचाकीवरून येऊन काहीतरी विचारपूस करण्याचा बहाणा करून गळ्यातील सोन्याचे दागिने ओढून नेल्याने जबरी चोरीचे गुन्हे दाखल होते. दरम्यान, सातारा शहर व परिसरामध्ये दुचाकी, मोबाईल चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्याबाबत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना केल्या होत्या. पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करून त्यांना वरील प्रकारचे गुन्हे उघड करून संशयितांना अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
प्रसन्न जऱ्हाड व पथक सातारा शहर व परिसरामध्ये गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना त्यांना सातारा शहर परिसरात चेन स्नॅचिंग व दुचाकी चोऱ्या केलेले संशयित पुन्हा चोरी करण्याकरिता येणार असल्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने सापळा रचून संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्यांनी चेन स्नॅचिंग व दुचाकी चोरीचा गुन्हा कबूल केल्याने त्यांना दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक करण्यात आले. पोलीस कोठडीत त्यांच्याकडून इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत केलेल्या चोरीच्या गुन्ह्यात चेन स्नॅचिंग करून चोरलेले मौल्यवान सोन्याचे दागिने, दुचाकी, मोबाईल जप्त केले आहेत.
एक वर्षापूर्वी वाई तालुक्यातील खेडेगावांमध्ये महिलांना सोने पॉलिश करण्याच्या बहाण्याने सोन्यातील काही सोने केमिकलचा वापर करून, गाळून काढून घेऊन महिलांची फसवणूक होत असल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या अनुषंगाने अटक केलेल्या टोळीकडे कसून चौकशी केली असता फसवणुकीचे गुन्हे केल्याची कबुली त्यांनी दिली. अटक केलेल्या टोळीने तारळे ते सडावाघापूर मार्गावर समर्थगाव व उंब्रज परिसरामधून ऊसतोड व वीटभट्टीवर काम करणारे कामगार यांच्या घरामध्ये चोNया करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस फौजदार पृथ्वीराज घोरपडे, ज्योतीराम बर्गे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर बनकर, प्रवीण शिंदे, मुबीन मुलाणी, संतोष पवार, विजय कांबळे, मोहन नाचण, शरद बेबले, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, विशाल पवार यांनी सहभाग घेतला.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या