'राष्ट्रीय' दर्जा मिळवण्यासाठी चक्क 'ती' सात 'पाखरे' मैदानात
विपूल शहा / शिराळा : कोरोनाचे संकट आ वासून उभे असताना बिहारची निवडणूक जाहीर झाल्याने सर्वांचेच डोळे विस्फारले गेले आहेत. पण याव्यतिरिक्त आता आणखी एका आगळ्यावेगळ्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही आणि कोणती निवडणूक हे समजले, तर सर्वांनाच आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही.
वाघ हा राष्ट्रीय प्राणी, मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे. त्याच धर्तीवर राष्ट्रीय फुलपाखरू निश्चित करण्यासाठी शुक्रवारपासून फुलपाखरांची निवडणूक सुरू झाली आहे. देशात सर्वाधिक मतांनी निवडून येणाऱ्या फुलपाखराला राष्ट्रीय फुलपाखराचा मान मिळणार आहे.
या उपक्रमासाठी देशातील फुलपाखरू तज्ज्ञ एकत्र आले असून, सात वैशिष्ट्यपूर्ण फुलपाखरे हा मान मिळवण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.
जैवविविधतेतील अन्नसाखळीमध्ये फुलपाखरू हा एक महत्त्वाचा कीटक आहे. रंगीबेरंगी अतिशय मनमोहक अशी ही फुलपाखरे फुलांचे, पिकांचे, वनस्पतींचे परागीकरण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतात.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात फुलपाखरांचे जवळपास ७४ हून अधिक प्रकार नोंद केले आहेत. त्यातीलच एक म्हणजे ब्लू मोर्मोन हे महाराष्ट्राचे ‘राज्य फुलपाखरू’ म्हणून ओळखले जाते.
जैवविविधता आणि परिसंस्था या आपल्या सभोवताली असलेल्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मूलभूत घटक आहेत. त्यामध्ये आपल्या घराशेजारी, शेतात, माळरानात, जंगलात आढळणारे कीटक, पक्षी, उभयचर प्राणी, सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी तसेच पाण्यामुळे आढळणारे मासे, खेकडे यांचा सहभाग होतो.
सध्या आपल्या देशाचे राष्ट्रीय फुलपाखरू निवडीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये शिराळा, कडेगाव, पलूस व इस्लामपूर जैवविविधता समिती अंतर्गत प्लॅनेट अर्थ फाऊंडेशनच्या माध्यमातून मदत करण्यात येईल.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या