शिराळ्यात सहा टन क्षमतेच्या ऑक्सिजन टँक उभारणीस प्रारंभ | Latest Marathi News


शिराळा :
येथील उपजिल्हा रुग्णालयात सहा टन क्षमतेचा ऑक्सिजन टँक उभारणीचे काम सुरू झाले असून याचबरोबर रुग्णालयातील सर्व ७५ बेडसाठी सेंट्रल व्यवस्थेचे कामही पूर्ण झाले आहे. त्यामुळे काही दिवसातच रुग्णांना याचा फायदा होणार आहे.

काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या आढावा बैठकीत ऑक्सिजन टँक, सेंट्रल व्यवस्था तसेच जंबो सिलेंडर देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार तहसीलदार गणेश शिंदे, उपअभियंता अतुल केकरे, पी. व्ही. कदम यांच्या देखरेखीखाली ४० लाख रुपये खर्चाच्या ६ मेट्रिक टन क्षमतेच्या ऑक्सिजन टँकचे काम सुरू झाले आहे. याचबरोबर रुग्णालयातील सर्व ७५ बेडसाठी सेंट्रल व्यवस्थेचे कामही पूर्ण झाले आहे. यावेळी डॉ. विलास रावळ, डॉ. जे. के. मोमीन, डॉ. अनिरुद्ध काकडे, डॉ. मनोज महिंद आदी उपस्थित होते.

या रुग्णालयासाठी १५ जंबो ऑक्सिजन सिलेंडरही आले आहेत. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्णांना उपचारासाठी धावपळ करावी लागत आहे, तर काहींना जिवासही मुकावे लागले आहे. ही व्यवस्था सुरू झाल्यावर येथील दोन व्हेंटिलेटर कार्यरत होणार आहेत. याबाबत भूलतज्ञ तसेच कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच कोविड रुग्णांसाठी लागणारी अत्यावश्यक औषधे व इंजेक्शनचीही मागणी करण्यात आली आहे. यातील काही औषधे उपलब्ध झाली आहेत.




Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या