Marathi News... सातारा : समाजासाठी कोरोनाच्या काळात अविरतपणे झटणारे शिवसेनेचे सातारा शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्या आईलाही कोरोनाची बाधा झाली होती. या मायलेकरांनी इच्छाशक्तीने कोरोनावर मात केली. कोरोनाला हरवून परत घरी आल्यावर ते रहात असलेल्या सोमवार पेठेतील नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. सध्या दोघेही घरी आराम घेत आहेत. त्यांनी दिलेल्या लढ्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
बाळासाहेब शिंदे यांना मंगलमूर्ती हॉस्पिटलमधून नुकताच डिस्चार्ज मिळाला. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, दै. सामनाचे सातारा जिल्हा प्रतिनिधी गजानन चेणगे, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, गोल बाग मित्र समूहाचे दीपक शिंदे, संदीप थोरात, प्रशांत थोरात व सर्व सहकारी यांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
जनतेच्या सेवेसाठी १० ऑक्टोबरपासून सामाजिक कार्यात सहभागी होणार आहे. तसेच माझी आई श्रीमती कांता शिंदे (वय ७५) यांनाही सिव्हिल हॉस्पिटलमधून १७ दिवसानंतर घरी सोडण्यात आले असून त्यांची तब्येत एकदम बरी आहे. तुमच्या प्रेमामुळे या कोरोनाच्या महामारीतून आम्ही एकदम ठणठणीत बरे झालो आहोत, असे बाळासाहेब शिंदे म्हणाले. मंगलमूर्तीचे डॉ. जयदीप चव्हाण, नितीन लेंभे, डॉ. विकास पाटील, डॉ. दिवेकर यांनी चांगल्याप्रकारे उपचार केल्याबद्दल त्यांचेही शिंदे यांनी आभार मानले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या