सातारा : कोरोनाच्या विरोधातील युध्दात प्रत्यक्ष योगदान देणाऱ्या एका भगिनीवर तात्काळ घर सोडून जाण्यासाठी सोसायटीतील लोकांनी दडपण आणले असल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. संकटाच्या काळात जीव धोक्यात घालून मानवसेवेचेच काम करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत असा अमानवीय व्यवहार केला जात आहे. संबंधित भगिनीने याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे धाव घेऊन आरोग्य सेवकांच्या सुरक्षेबाबत आदेश काढण्याची मागणी केली आहे.
संबंधित भगिनी सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रूग्णालयात १ सप्टेंबरपासून लॅब टेक्निशियन म्हणून काम करत आहे. त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सातारा शहरालगतच्या तामजाईनगर येथे एका कॉलनीत आपण राहतो. जिल्हा रूग्णालयात काम करू लागल्यापासून सोसायटीतील अन्य रहिवाशांनी घरमालकांकडे तक्रार करण्यास सुरूवात केली आहे. तशी कल्पना आपण आशा सेविकेला दिली आहे. परवाच म्हणजे ६ सप्टेंबर रोजी आपल्या सासNयांचे किरकोळ आजारात योग्य ते उपचार व डॉक्टर न मिळाल्याने निधन झाले. तरीही दि. ८ रोजी आपण कामावर हजर झालो. परंतु काल (दि. ९) आपले पती गावाकडे एकट्या असलेल्या वृध्द आईकडे गेले असताना सोसायटीतील रहिवाशांनी घरमालकांना बोलावून घेऊन उद्याच्या उद्या आपणास घर सोडायला सांगा असे धमकावले आहे. तसेच अगदीच साहित्य घेऊन जाणे लगेच शक्य नसल्यास घरी न येण्याबाबत आपणास ताकिद दिली आहे.
संबंधित लोकांवर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा कोरोना लढ्यात सेवा देत असलेल्या लोकांविषयी सामाजिक अस्पृश्यतेला हातभार लागेल, अशी भीती निवेदनात व्यक्त केली आहे. निवेदनाची प्रत जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनाही पाठवण्यात आली आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या