कराडला नीट परीक्षेचे केंद्र मंजूर; डॉ. महेश खुस्पे यांच्या पाठपुराव्याला यश | Latest Marathi News


कराड :
मेडिकलला प्रवेश घेण्यासाठीची 'नीट' परीक्षा १३ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत होणार आहे. ही नीट परीक्षा तालुका स्तरावर व्हावी यासाठी कराड येथील कोटा अ‍ॅकॅडमी व ज्युनियर कॉलेजचे संस्थापक डॉ. महेश खुस्पे यांनी एप्रिल महिन्यात केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. यावर्षी कराड येथे नीट परीक्षेचे केंद्र मंजूर झाले आहे. 

मे महिन्यात ही परीक्षा होणार होती. परंतु कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. ती आता होत आहे. परीक्षेसाठी कराड केंद्र मंजूर झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कराड येथील शासकीय पॉलिटेक्निक व पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये हे केंद्र असणार आहे. कराडच्या परीक्षार्थींसाठी ही आनंदाची बाब आहे.

या कामात आपणास पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, डॉ. अतुल भोसले, यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे डॉ. खुस्पे यांनी सांगितले. परीक्षा केंद्र कराड येथे सुरू झाल्याने पालक व विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या