तारळे गावची भीम यात्रेची शेकडो वर्षांची परंपरा यंदा झाली खंडित | Latest Marathi News


सातारा :
पाटण तालुक्यातील तारळे या गावी भाद्रपद महिन्यात होणारी भीमसेन यात्रेची परंपरा कोरोना संकटामुळे यावर्षी खंडित झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यात्रा कमिटी, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने भाद्रपद पौर्णिमेला रात्री भंडारा, महाप्रसाद, जाधव आळीचे तालीम संघाचे मानाचे उदबत्त्यांचे झाड, मर्दानी खेळ, शोभेचे दारूकाम, आतषबाजी आदी सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

प्रतिवर्षी पारंपरिक ७ फुटी भीमाची सजवलेली मूर्ती असायची. तिचा आकार यावर्षी साडेचार फूट करण्यात आला आहे. हरिनाम, भजनाचे कार्यक्रमही रद्द केले आहेत. बुधवार दि. २ व गुरुवार दि. ३ रोजी चा उत्सव रद्द केला आहे. गुरुवारी नियमांचे पालन करून भीम - कुंती विसर्जनाने उत्सवाची सांगता होणार आहे. त्यामुळे भाविकांनी गर्दी करू नये व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या