प्रवेश प्रक्रियेत लागणाऱ्या कागदपत्रांसाठी विद्यार्थी - पालकांची ससेहोलपट | Latest Marathi News

सातारा : शाळा तसेच महाविद्यालयांचे प्रवेश सुरू झाल्याने आवश्यक असणारी कागदपत्रे काढण्यासाठी तहसील, प्रांत कार्यालयासोबतच सेतू कार्यालयही गजबजून गेले आहे. विविध दाखले व इतर शासकीय व्यवहार करण्यासाठी मुद्रांक विक्रेत्यांकडे नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. 

उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र आदींच्या प्रतिज्ञापत्रासाठी मुद्रांक शुल्क भरण्याची गरज नाही. त्यासाठीचे मुद्रांक शुल्क शासनाने माफ केले आहे. त्यामुळे सध्या कागदावरच स्वयंघोषणापत्र किंवा नागरी सुविधा केंद्रात प्रतिज्ञापत्र केले तरी चालते. त्यासाठी १०० रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र देण्याची आवश्यकता नाही. या निर्णयामुळे दहावी तसेच बारावी निकालानंतर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र विविध कारणांसाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे तसेच विविध अर्जासाठी लागणारे कोर्ट स्टॅम्प फी यासाठी नागरिक मुद्रांक विक्रेत्यांकडे गर्दी करू लागले आहेत. 

बहुतेक वेळा आवश्यक मुद्रांक व कोर्ट फी स्टँपची तिकिटे संपल्याचे कारण पुढे करून मुद्रांक विक्रेत्यांकडून नागरिकांची गैरसोय केली जात आहे. त्यामुळे १०० रुपयांचा मुद्रांक तसेच १० रुपयाच्या कोर्ट फी स्टॅम्पसाठी नागरिकांना नोंदणी व मुद्रांक कार्यालयाच्या आवारात भटकण्याची वेळ येत आहे.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या