चंद्रलेखाराजे यांची अंत्ययात्रा सोमवारी सकाळी ९ वाजता निघणार | Latest Marathi News


सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील स्नूषा व सातारचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या सुविद्य पत्नी श्रीमंत छत्रपती चंद्रलेखाराजे भोसले यांची अंत्ययात्रा सोमवारी सकाळी नऊ वाजता अदालत राजवाडा येथून निघणार आहे. त्यानंतर संगममाहुली (सातारा) येथे कृष्णातीरावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

छत्रपती शिवरायांच्या घराण्याच्या संस्कारानुसार सर्वसामान्य जनतेशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणाNया चंद्रलेखाराजे यांचे आज दुपारी निधन झाल्याचे वृत्त पसरताच शाहूनगरीवर दु:खाची छाया पसरली. त्यांचा सहवास लाभलेल्या अनेकांना दु:खावेग आवरणे कठीण झाले. अनेकांनी अदालत वाड्याकडे धाव घेतली. विधान परिषदेचे सभापती व राजघराण्याशी नातेसंबंध असलेले महाराणी सईबार्इंच्या घराण्यातील रामराजे नाईक - निंबाळकर, जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, सातारचे सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वाईकर यांच्यासह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे सांत्वन केले. 

श्रीमंत छत्रपती चंद्रलेखाराजे तथा वहिनीसाहेब यांचे बडोदा हे माहेर. तेथून त्यांचे बंधू, बहीण आदी सातारला येण्यासाठी रवाना झाले असून बंगळुरू येथूनही नातेवाईक येत आहेत. त्यामुळे सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सकाळी नऊ वाजता अदालत राजवाडा येथून अंत्ययात्रा निघणार आहे. त्यानंतर संगममाहुली येथे कृष्णातीरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from  politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या