जिल्ह्यात कोरोनाची आजपर्यंतची मोठी लाट; ७१३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह | Latest Marathi News


दिवसभरात ३७३ जणांना डिस्चार्ज... ९४२ जणांचे नमुने पाठवले तपासणीला

सातारा : बुधवारी रात्री उशीरा सातारा जिल्ह्याची झोप उडवणारी कोरोना लाट आली आहे. या वृत्तानुसार तब्बल ७१३ जणांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून आजअखेरचा हा एका दिवसातील सर्वोच्च आकडा आहे. या आकड्यासह जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १६ हजारच्या उंबरठ्यावर जावून पोहोचला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विविध रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या  ३७३ नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले आहे, तर ९४२ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

रात्री उशीरा प्राप्त झालेल्या माहितीनुसार ७१३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याची सविस्तर तालुका, गावनिहाय माहिती यंत्रणेकडून गुरूवारी सकाळी देण्यात येणार आहे. आज दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील ३०, कराड तालुक्यातील ८२, खंडाळा २७, खटाव तालुक्यातील ९, कोरेगाव १२, महाबळेश्वर तालुक्यातील ४, माण तालुक्यातील १७, पाटण तालुक्यातील ९, फलटण तालुक्यातील ४, सातारा तालुक्यातील १४८ व वाई तालुक्यातील ३१ नागरिकांचा समावेश आहे. इतक्या लोकांना डिस्चार्ज मिळाल्यामुळे जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला आहे.

तसेच स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील १६, उपजिल्हा रुग्णालय कराड १६९, फलटण उपजिल्हा रुग्णालय ३४, कोरेगाव ९६, वाई ३२, खंडाळा ९९, रायगाव ६८, पानमळेवाडी ५४, मायणी १०४, महाबळेश्वर ४२, पाटण ११, दहिवडी २८, खावली ५० व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे १३९ अशा एकूण ९४२ जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या