Marathi News.. मसूर : कराड तालुक्यातील मसूर येथील प्रसिध्द कापड व्यापारी संदीप (भैय्या) शांताराम लंगडे (वय ५०) यांचे शनिवारी रात्री उशीरा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, आई, भाऊ असा मोठा परिवार आहे.
संदीप लंगडे हे उच्चशिक्षित होते. प्रेमळ, मनमिळावू होते. सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग असे. वडिलांच्या पश्चात ज्येष्ठ बंधू सुनीलदत्त लंगडे यांच्यासह त्यांनी कापड व्यवसायात लौकिक मिळवला होता. श्री दत्त कलेक्शनच्या माध्यमातून त्यांनी मसूर परिसरात सर्वांशी स्नेहाचे संबंध जोडले होते. अलीकडेच त्यांनी कराड - ओगलेवाडी मार्गावर गजानन हौसिंग सोसायटी येथे मदुरा कलेक्शन नावाने दुसरे दुकान सुरू केले आहे. त्यांचा मित्रपरिवार मोठा होता.
शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल मसूर व परिसरात लोकांनी हळहळ व्यक्त केली. आज सकाळी मसूर येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन विधी सोमवारी सकाळी ९ वाजता होणार आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या