उच्चांकी रूग्णवाढीवेळी उच्चांकी डिस्चार्ज; दिवसभरात ८७० जण परतले स्वगृही | Latest Marathi News


सातारा :
अंगाचा थरकाप उडवणाNया रूग्णवाढीमुळे हबवूâन गेलेल्या जिल्हावासीयांना आजच्या ८७० जणांच्या डिस्चार्जने मोठाच दिलासा दिला. जिल्ह्यात विविध रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटर येथून आज संध्याकाळपर्यंत या रूग्णांना घरी सोडण्यात आले, तर ६८२ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील ११, कराड उपजिल्हा रुग्णालय १३, फलटण उपजिल्हा रुग्णालय ५४, कोरेगाव ३७, वाई ५६, खंडाळा ५७, रायगाव ७६, पानमळेवाडी ४५, मायणी २७, महाबळेश्वर ५०, दहिवडी ४९,  खावली ४१ व कृष्णा मेडिकल कॉलेज येथे १६६ अशा एकूण ६८२ जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.

सातारा जिल्हा कोरोना

  1. घेतलेले एकूण नमुने - ४७,३४७
  2. एकूण बाधित - १५,९६०
  3. घरी सोडण्यात आलेले - ९,०२१
  4. मृत्यू - ४४३
  5. उपचारार्थ रुग्ण - ६,४९६

Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या