कोरोनासंदर्भातील सूचना न पाळणाऱ्यांना उंब्रज पोलीस ठाण्याचा दणका
उंब्रज : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असुनही जे लोक सूचनांकडे दुर्लक्ष करून बेजबाबदारपणे वागतात, त्यांच्यावर उंब्रज पोलीस ठाण्याने दंडात्मक कारवाया केल्या आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी गेल्या पाच दिवसात ३६४ केसेस करण्यात आल्या असून त्यामध्ये १ लाख ३१ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोना संसर्गाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जनतेने प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले पाहिजे. पण अद्यापही लोकांना गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे धडक कारवाई सुरू केली आहे. त्यामध्ये मास्क न वापरणे - १७२ केसेस, दुकानासमोर व सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग न पाळणे - ९ केसेस, वाहतुकीचे नियम न पाळणे व कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनी दिलेल्या वाहतुक विषयक सूचनांकडे दुर्लक्ष करणे - १६१ केसेस, सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणे व तंबाखू, पान खावून थुंकणे - २२ केसेस अशा एकूण ३६४ केसेस करून एकूण १ लाख ३१ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे, असे उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी सांगितले.
सध्याची कोरोना परिस्थिती पाहता नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, मास्कचा वापर करावा, अन्यथा ५०० रूपये दंडात्मक कारवाई होईल, एकत्र गर्दी करून थांबू नये, गप्पा मारत बसू नये, मार्केटमध्ये किरकोळ कारणासाठी फिरत बसू नये, कमीत कमी ६ फुट अंतर ठेवून बोलावे, लहान मुले / ६५ वर्षावरील व्यक्ती / घरातील आजारी असणारे नागरिक यांनी घराबाहेर पडून फिरू नये, सर्व दुकानदार (सलून दुकानदार, भाजी विक्रेते यांनी सोशल डिस्टन्सबाबतच्या आदेशाचे पालन करावे (अन्यथा ५०० / १००० रूपये दंड होईल), आपण व आपले कुटुंब सुरक्षित राहण्यासाठी स्वत:हून काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या