सातारा : कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना बाधितांना बेड उपलब्ध होत नसल्याने रूग्णांची व त्यांच्या कुटुंबीयांची खूपच हेळसांड होत आहे. या पार्श्वभूमीवर सातारा - जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या मालकीच्या पुष्कर मंगल कार्यालयात ८२ बेडचे कोविड केअर सेंटर उभे केले आहे. सोमवारी हे सेंटर प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आले.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, कर्तव्य सोशल ग्रूपच्या संस्थापक वेदांतिकाराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे हे कोरोना केअर सेंटर सुपूर्द केले. यावेळी प्रांत मिनाज मुल्ला, डॉ. स्नेहा सकट, नगरसेवक अमोल मोहिते, अविनाश कदम, विजयकुमार काटवटे, दीपलक्ष्मी नाईक, विठ्ठल बलशेटवार, भाजपचे शहराध्यक्ष विकास गोसावी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
या कोरोना केअर सेंटरमध्ये योग्य अंतर राखून बेड, बाथरूम, टॉयलेटची सुविधा करण्यात आली आहे. ८२ बेडपैकी ४२ बेड हे ऑक्सिजन युक्त असणार आहेत. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना जेव्हा ऑक्सिजनची गरज पडते, तेव्हा या कोरोना केअर सेंटरमध्ये त्यांची काळजी घेतली जाणार आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढतो असल्याने, घरामध्ये काकी चंद्रलेखाराजे भोसले यांच्या निधनामुळे आम्ही दु:खात असतानादेखील लोकांची गरज व अडचण ओळखून या कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन घेतले, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.
संपूर्ण जिल्ह्यातील रूग्णांना होणार लाभ
आमच्या घराला समाजकार्याचा वारसा आहे. आज जनता संकटात सापडलेली आहे. त्या जनतेला हात देण्यासाठी आम्ही पाऊल टाकले आहे. केअर सेंटर सुरू करण्याचा आमचा निर्णय झाल्यानंतर काही लोकांनी या चांगल्या कामात अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला. हे सेंटर शिवेंद्रसिंहराजे यांच्या कार्यकर्त्यांसाठी म्हणून केले आहे, असे हिणवण्यात आले. परंतु कार्यकर्ते हे माणूसच आहेत. याठिकाणी शहर, तालुका असे कुठलेही बंधन नाही. संपूर्ण जिल्ह्यातील अत्यवस्थ आणि गरजू रुग्णांना या ठिकाणी उपचार होणार आहेत, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या