पाटण : मद्यधुंद रिक्षाचालकाने भरधाव वेगाने चुकीच्या दिशेने येवून समोरून येत असलेल्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारार्थ कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाटण तालुक्यातील सुरूल येथे शनिवारी (दि. १३) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत सौरभ हणमंत संकपाळ (वय २०) याने पाटण पोलिसात फिर्याद दिली आहे.
सुरूल येथील हणमंत निवृत्ती संकपाळ (वय ४६) व त्यांचा मुलगा सौरभ हणमंत संकपाळ (वय २०) हे दोघेजण दुचाकीवरून (एमएच ११ एस ०३५९) सुरुलकडून पाटणला निघाले होते. यावेळी पाटणकडून सुरूलच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या रिक्षाचालक अधिक रमेश देसाई (रा. पाटण) याने आपली रिक्षा (एमएच ५० एम ०६७०) चुकीच्या दिशेने येवून समोरून येनाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील हणमंत संकपाळ यांच्या पायाला, तोंडाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर सौरभ संकपाळ हा किरकोळ जखमी झाला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पाटण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होवून अपघाताचा पंचनामा केला. यावेळी रिक्षाचालक अधिक रमेश देसाई हा दारूच्या नशेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या अपघातप्रकरणी अधिक देसाई याच्याविरूध्द पाटण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार कोळी करत आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या